The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २८ सप्टेंबर : तालुक्यातील नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवरगाव, राजोली, एरंडी, भुरानटोला या चारही गावात २६ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली.
यावेळी चारही गावात फेरी काढून गावातील प्रत्येक कुटुंबा कडुन मूठभर माती व भूमिहीन लोकांकडून मूठभर तांदूळ गोळा करण्यात आले. तसेच १७ सप्टेंबर २०२३ पासुन गावात श्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. २ आक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती पर्यंत कायम राहणार आहे. कलश यात्रा मध्ये आदिवासी गोंडी वाद्य वाजवून दिंडी काढण्यात आली.
कलश यात्रेला चारही गावातील नागरिक, महिला बचत गट सदस्य, युवक, युवती, महिला मंडळ यांनी सहकार्य केले. कलश यात्रेत ग्रामपंचायतचे सरपंचा रंजनाताई शिडाम, उपसरपंचा कुमारी लक्ष्मी गोवा, सचिव खुशाल नेवारे, कपिल गोवा (सदस्य), बिसन हलामी (सदस्य ), रूपाली कोरचा (सदस्य), रेशमीला मडावी (सदस्य), महागु वाटगुरे, मनोहर गुरनुले, नाजुकराव नरोटे, मादगु गावडे, वासुदेव कुमोटी पो. पाटील (एरंडी), वनस्कर पोलीस पाटील, राजोलि, लोमेश कोकोडे (रोजगार सेवक), सौ रंजना नरोटे, जीटू कोवा, नाजूकराव पदा, नवरगाव सर्व शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि भजन मंडळ सहभागी झाले होते.