– आमदार कृष्णा गजबे यांनी लक्षवेधी सुचणेच्या माध्यमातून कृषि मंत्र्यांचे वेधले लक्ष
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, ३० जुलै : आरमोरी मतदार संघातील सन २०२२-२३ मधील प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाईची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान आमदार कृष्णा गजबे यांनी लक्षवेधी सुचणेच्या माध्यमातूनभरपाई देण्याची मागणी पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात केली असता मतदार संघातील सन २०२२-२३ मधील प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाईची चौकशी होणार आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सुचणेच्या प्रश्नोत्तरात आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदार संघातील आरमोरी, वडसा,कुरखेडा व कोरची तालुक्यात सन २०२२-२३ मध्ये पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी, मोका चौकशी करण्यात आली परंतु शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. याकरिता चारही तालुक्यातील प्रकरणांची चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यावर कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी सकारात्मक उत्तर देत सदर प्रकरणी चौकशी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.