अज्ञात चारचाकी वाहनाने बैलगाडीला दिलेल्या धडकेत बैल जागीच ठार, बैलगाडी चालक जखमी

247

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०२ : आरमोरी तालुक्यातील करपडा गावाजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने बैलगाडीला दिलेल्या धडकेत बैल जागीच ठार झाले तर बैलगाडी चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी २ जुलै ला सायंकाळी ०५ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, करपडा येथील शेतकरी रामदास डोंगरवार हे शेतातून बैलगाडी घेवून करपडा गावाकडे येत होते. दरम्यान विरुद्ध दिशेने लोहारा गावाकडून अज्ञात चारचाकी वाहन येत असताना बैलगाडीला दिलेल्या जोरदार धडकेत रामदास डोंगरवार रा. करपडा (वय अंदाजे ५० ) हे जखमी झाले. घटनेच्यावेळी बैलगाडी एक चाक निघाले आणि बैलगाडी चे एक बैल जागीच ठार झाले. त्यामुळे ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे कधीही भरुन न निघणार येवढे नुकसान झाले पण अज्ञात चारचाकी वाहन घटनास्थळावरून घेऊन पसार झाला. संबंधित वाहन धारकावर कारवाई करुण नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #accident )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here