– गोंदिया – कोहमारा मार्गावर भीषण अपघातात प्रवाशांचा मृत्यू
The गडविश्व
अर्जुनी- मोरगाव, दि. २९ : शिवशाही बस पलटून झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू तर १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवार २९ नोव्हेंबर रोजी गोंदिया – कोहमारा मार्गावर डव्वा जवळ घडली. या भीषण अपघात मृत्यू झालेल्यांमध्ये महिला पोलिस शिपायाचा सामावेश असून त्या आपल्या सुट्टी आटोपून कर्तव्यावर रुजू होण्यास जात होत्या मात्र काळाने घात केल्याने तिची कायमचीच गैरहजेरी पडली आहे.
स्मिता सूर्यवंशी असे त्या महिला शिपायाचे नाव आहे. पती पोलिस दलात कार्यरत होते. आजाराने त्यांचे आजाराने यापूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर मोठा आघात झाला होता. आपले सासू सासरे व लहान बालकांसह आपले हलाखीचे जीवन जगत असताना २०२३-२४ या पोलीस भरतीमध्ये त्यांची गोंदिया पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती झाली. काही महिन्यांपूर्वीच त्यांची ट्रेनिंग पूर्ण झाली. मुलगा गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे शिक्षण घेत असल्याचे कळते. तर कुटुंबात सासू सासरे असा कुटुंब असून आई वडीलही आहे. दरम्यान विधानसभा निवडणुका आटोपून रजेवर जाऊन आपल्या परिवारांना भेटून स्मिता आज २९ नोव्हेंबर ला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोर वरुन साकोली ला गेली व तिथुन गोंदिया ला जाण्यासाठी याच अपघातग्रस्त बसने जात असता हा दुर्देवी अपघात घडल्याने स्मिता चा जागीच मृत्यु झाला. सुट्टी आटोपून कर्तव्यावर रुजू होण्यास जात असतानाच दुर्दैवी घटना घडल्याने स्मिता ची आता कायमचीच गैरहजेरी पडली आहे. या दुर्देवी घटनेने अर्जुनी मोर शहरांसह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gondiyaaccident #roadaccident #arjunimorgao #bus accident)