The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : धानोरा तालुक्यातील सर्च शोधग्राम येथील माँ दंतेश्वरी रुग्णालयात डॉ. आशुतोष जाधव व GMC टिम नागपूर यांच्या नेतृत्वात ०७ मे २०२४ रोजी एनोरेक्टल शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्चद्वारे मागील १८ वर्षापासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्या जात आहे. ज्या रूग्णांना संडासच्या वेळी रक्त पडणे- वेदना होणे , रक्ताची धार लागणे, संडासच्या वेळी कोंब बाहेर येणे, संडासच्या जागी वारंवार फोड येवून पु/पस वाहणे, गुद्दभागी चिरा पडून टोचल्याप्रमाणे वेदना होणे व बसण्याचा त्रास होणे या प्रकारची आजारांसंबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांनी ०५ मे २०२४ पूर्वी सर्च रुग्णालयात येउन ऑपरेशनपूर्व तपासणी करुन घ्यावी व या शिबिरासाठी आपले नाव नोंदवून घ्यावे.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांना शस्त्रक्रियेची सुविधा मिळावी यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयाने एनोरेक्टल सर्जरी कॅम्पचे आयोजन केले आहे. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत राहणार आहे, सर्जरीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मेससुविधा मोफत दिल्या जाईल. तरी दिनांक- ०७ मे २०२४ रोजी होणार्या एनोरेक्टल सर्जरी कॅम्प करिता रुग्णांनी सर्च रुग्णालयात येऊन ऑपरेशन पूर्व तपासणी करून सर्जरी करिता आपले नाव नोंदवावे. ऑपरेशन सुविधेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घ्यावे असे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #kurkheda #kumbhitola #crimenews #muktipath)