– मृतक नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता, घटनास्थळावरून हत्यारे व नक्षली साहित्य जप्त
The गडविश्व
दंतेवाडा, दि. २५ : छत्तीसगडच्या दंतेवाडा, बीजापूर आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळच्या सुमारास जोरदार चकमक उडाल्याची माहिती आहे. या चकमकीत ३ नक्षली ठार झाल्याची माहिती असून मृतक नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इंद्रावती नदीपलीकडे मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जमल्याची गुप्त माहिती मिळाली असता सुरक्षा दलांने मोठे ऑपरेशन राबवले. जवळपास ५०० जवानांनी या भागात २५ मार्च रोजी अभियान राबवून नक्षलवाद्यांचा वेढा घेतला. या दरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक उडाली दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. बातमी लिहीस्तव चकमक सुरूच होती, चकमकीत ३ नक्षली ठार झाले तर घटनस्थळावरून हत्यारे व नक्षली साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. संपूर्ण ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरच नेमकी माहिती समोर येणार आहे. https://x.com/ANI/status/1904502154741580117?s=19
दरम्यान याच भागात ४ दिवसांपूर्वीच दोन मोठ्या चकमकी झाल्या होत्या, ज्यात सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. दंतेवाडा-बीजापूर सीमेवर २६ तर कांकेरमध्ये ४ नक्षलवादी ठार झाले होते. TCOC (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) दरम्यान ही मोठी हानी नक्षलवाद्यांना सहन करावी लागली आहे.
