-जनजागृतीतुन व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नगरपंचायत, पोलिस विभाग, आरोग्य विभाग व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध तालुका मुख्यालयासह ग्रामीण भागात जनजागृती करून सुगंधित तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम पटवून देण्यात आले. सोबतच मोहीम राबवून पानठेला व किराणा व्यवसायिकांकडुन मिळून आलेला तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करण्यात आला.
धानोरा येथे ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थ विक्री सुरु असणाऱ्या एकुण ६ पानटपरीवर धाड टाकून १२०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. यामध्ये NCD विभाग मधील समुपदेशक गौतम राऊत , मुक्तीपथ टीम तसेच संतोष मलगाम, मनोज दुगा पोलीस शिपाई उपस्थित होते. सिरोंचा येते मुक्तिपथ, NCD आणि पोलिस विभागाने शहरात ९ वॉर्डातील पानठेल्यांची तपासणी केली बस स्टँड एरिया सर्व दुकान बंद होते तसेच लपून छपून खर्रा विक्री करणाऱ्या ४ जणांकडून कोटपा कायदा अंतर्गत प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करून मिळालेला तंबाखूजन्य पदार्थ नष्ट करण्यात आला.
चामोर्शी शहरातील ग्रामीण रुग्णालय व मुक्तिपथ च्या संयुक्त विद्यमाने केवळराम हरडे कृषी महाविद्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध वार्डामध्ये किशोरी जाणीव जागृती दरम्यान HB, blood test, उंची, वजन करून तंबाखू पासून आरोग्यावर होणारे दुषपरिणाम व कोटपा कायदा या बाबत जाणीव जागृती केली. जागतीक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी तंबाखू, गुटखा, खर्रा यापासून दूर राहावे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून मुक्तीपथ तालुका टीमने जनजागृती केली. याप्रसंगी आरोग्य विभागाचे एकूण सात कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ घेतली. अहेरी तालुक्यात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. नागरिकांना व व्यापारी वर्गांना गडचिरोली जिल्ह्याची सध्याची परिस्थिती व जिल्ह्यात कर्करोगाचे सध्याचे वाढत असलेले प्रमाण यावर मार्गदर्शन करण्यात आले. कोटपा कायदा २००३ नुसार सार्वजनिक ठिकाणी व शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू सेवन व तंबाखूजन्य पदार्थ स्वतःजवळ बाळगने हे कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. हे समजावून सांगण्यात आले. तसेच शहरात शोधमोहीम राबवून ८० हजारहुन अधिक रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आला. संबंधित विक्रेत्यांकडून २०० रु प्रमाणे एकूण १४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत एण.सी. डी विभागाचे गोपाल कोडापे, पोलीस विभागाचे पि. आय. वाघमोडे यांच्या मार्गर्शनाखाली संजय मोगलीवार , मुक्तीपथ तालुका चमू नंदिनी आशा व भुषण गौरी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.
देसाईगंज शहरात तंबाखू विरोधी दिनानिमित्त तहसीलदार यांच्या आदेशानुसार एक भरारी पथक तयार करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून तहसील कार्यालय, एसडीओ ऑफिस, महसूल मंडळ, पंचायत समिती, नगर परिषद, पोलिस स्टेशन इत्यादी शासकीय कार्यालयात तपासणी करून तंबाखूजन्य सेवन करून आढळलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रति व्यक्ती २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या पथकात तहसील, नगरपरिषद, मुक्तिपथ, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कोरची, एटापल्ली, मूलचेरा तालुक्यात सुद्धा विवीध उपक्रम राबवून तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याचे आवाहन करण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #armori #muktipath #mulchera )