The गडविश्व
गडचिरोली, २७ जानेवारी : मा.धर्मादाय आयुक्त,म.रा.मुंबई यांचे वतीने यंदा गडचिरोली जिल्हयातील आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहीद जवान, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या इसमांची मुले, बेघर, पारधी समाज, गरीब गरजू, ऊसतोड कामगार,भटक्या जमाती, विमुक्त जाती,अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय यांची मुले-मुली व अनाथ मुले-मुली इत्यादींचे विवाह सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा समिती,गडचिरोली यांचे मार्फत 1 फेब्रुवारी ते 31 मे 2023 या कालावधीत आयोजित करणे आहे. करीता सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा समिती,गडचिरोली ही समिती गठीत करणेकरीता गडचिरोली जिल्हयातील धर्मादाय संस्था न्यास यांचे विश्वस्त व वकील यांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्र.2, जिल्हा जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ संपर्क साधावा. समिती गठीत झाल्यानंतर उपरोक्त गरीब-गरजु मुली-मुलीचे विवाह हया समिती मार्फत करण्यात येईल असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त गडचिरोली यांनी कळविले आहे.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (UPSSSC PET Result) (Tata Motors Share Price) (Adani Port share price) (Pariksha Pe Charcha 2023) (Masaba Gupta) (The Last of Us)