The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी द्विभाषिक/संघटक पदासाठी सुशिक्षित अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
या पदासाठी उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा. तसेच एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराला इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. वेगाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गोंडी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य असून, शासकीय कार्यालयात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी धनराज डबले यांनी केले आहे.
