The गडविश्व
गडचिरोली , दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापडूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रात विशेष उललेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय २९ डिसेंबर, २०२३ अन्वये व शासन निर्णय २५ जानेवारी, २०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, २०२३ विहीत केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा १४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link)मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर १४ ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत व २६ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केलेले आहे.