The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि . ०६ : तालुक्यातील चिंगली ग्रामपंचायतीने विद्युत विभागाअंतर्गत ग्रामवीज सेवक या पदावर संजय वड्डे या व्यक्तीची ११ महिन्यांसाठी अतिशय कमी मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली खरी परंतु कार्यरत व्यक्तीचा नियुक्तीचा कालावधी १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत असूनही कोणतीही सुचना, किंवा लेखी न कळवता चिंगली पासून ७ कि.मी.अंतरावरील व्यक्तीला अर्ज न मागवता तसेच कोणतीही जाहिरात न देता नियुक्ती करण्यात आल्याने हा माझ्यावर झालेला अन्याय आहे, अशा पद्धतीने करार मोडण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नसतानाही ग्रामपंचायत वाटेल तशी वागताना दिसत असुन माझी नियुक्ती कायम ठेवण्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाला २५ नोव्हेंबर २०२४ पत्र दिले असल्याचे संजय वड्डे यांनी सांगितले. सदर प्रकरणावरून चिंगली ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार दिसून येत आहे.
पत्रात म्हटले आहेन कि, चिंगली गट ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत ग्रामवीज सेवक पदावर पाच हजार रुपये मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. पुर्ननियुक्तिचा आदेश कार्यरत व्यक्ती ला महावितरण (MSCB) ने दिले त्यानंतर फक्त ठराव जोडून परत कार्यालयाला पाठवायचे होते. आदेश १४ऑगस्ट २०२४ ते १३ ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या कालावधीसाठी अगदी तात्पुरत्या स्वरूपावर दरवर्षी ११ महिन्यासाठी नियुक्ती दिली जाते. परंतु मागिल महिन्यात मला न विचारता किवा नविन नियुक्ती अमोल जे.कुमोटी खैरीटोला यांची करण्यात आली. मात्र नविन नियुक्ती करण्यासाठी आवश्यक पात्रते नुसार जाहिरात न करता चिंगलि गट ग्रामपंचायतिने दुसऱ्या व्यक्तिचि नियुक्ती केली. काम करणारा व्यक्ती मागिल आठ वर्षांपासून या पदावर आणि तेहि फक्त ५००० रुपये मानधन तत्वावर काम करवून घेतले. आदेश हातात असताना आणि कार्यरत असताना ग्रामपंचायतिने दुसऱ्याला नियुक्ती करने कितपत योग्य आहे. ग्रामपंचायतिने नियमाला हरताळ फासल्याचे दिसून येते. नियुक्त व्यक्ती वेगळा आणि प्रत्यक्ष काम करणारा व्यक्ती खुशाल कस्तुरे आहे. हे ग्रामपंचायतिच्या कोणत्या नियमात बसते. मला अंधारात ठेवून दुसऱ्याची नियुक्ती करणे कितपत योग्य आहे. मला दिलेल्या आदेशाची पायमल्ली असून माझ्यावर ग्रामपंचायतिने अन्याय केला आहे. ग्रामपंचायत ने बाहेरच्या व्यक्तिची नियुक्ती करने कितपत योग्य आहे. ग्रामविज सेवकांची जेवढे कामे आहेत ते मी नियमित करीत आहे. तात्पुरता आणि अल्प मानधन असल्याने ग्रामपंचायतीने स्थानिक व्यक्ती ची निवड करने आवश्यक असताना सुद्धा येथिल ग्रामपंचायतीने ७ कि.मी.अंतरावरील व्यक्तीची नियुक्ती केली कशी सवालही केला आहे.
जुन्या विज सेवकाला काढून नवीन ग्राम विज सेवक पदावर नियुक्तीचा ठराव मासिक सभेत घेण्यात आला.
– संजय येरमे
ग्रामसेवक गट ग्रामपंचायत चिंगलि