The गडविश्व
गडचिरोली, दि.०४ : येथील लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गडचिरोली येथील वेदांती व मातोश्री वृद्धाश्रमात वस्त्र दानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांना केवळ नोकरी व पैसा याकडे न बघता समाजाप्रती सामाजिक बधिलकी हा प्रत्येक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन असला पाहिजे, केवळ स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होणे व मान सन्मान मिळविणे हाच आपला हेतू असता कामा नये तर समाजातील एक चांगला नागरिक बनणे हा सुद्धा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा हेतू असला पाहिजे, केवळ थोर महात्म्यांच्या जयंतीदिनी भाषण बाजी न करता त्यांचे विचार आपण कृतीतून सुद्धा सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या प्रसंगी लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा.राजीव खोबरे सर यांनी व्यक्त केले.
लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे नेहमीच नवनवीन स्तुत्य उपक्रम राबविले जाते. स्पर्धा परीक्षेसोबतच आपल्या विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जोपासत प्रगतिशील मार्गाकडे जाण्याचे धडे या अकॅडमी मार्फ़त दिल्या जात आहे. त्यांच्या नवनवीन स्तुत्य उपक्रमाबाबत शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा होतांना दिसत आहे.
वस्त्रदान कार्यक्रमाला अकॅडमीचे प्रा. महेश मांझी सर, प्रा. तावडे सर तसेच अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, laksyvedh gadchiroli)