जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाने पोलीस भरतीला सामोरे जा : पोलीस अधीेक्षक नीलोत्पल

366

-१५० महिला प्रशिक्षणार्थींनी घेतले पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : आगामी पोलीस भरतीमध्ये जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने परिश्रम करुन यश संपादन करण्याचा संदेश पोलीस अधीेक्षक नीलोत्पल यांनी पोलीस भरती पुर्व निवासी प्रशिक्षणाच्या निरोप समारंभ कार्यक्रम दिला.
जिल्हयातील गरजु युवतींना पोलीस दलात रोजगाराची संधी देवून नोकरी मिळविणे करीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रातील युवतींकरीता पोलीस भरती पुर्व निवासी प्रशिक्षणाचे आयोजन गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे करण्यात आले होते. सदरचे प्रशिक्षण आज पुर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थींचे निरोप समारंभ कार्यक्रम एकलव्य धाम, गडचिरोली येथे पार पाडण्यात आला.
सदर पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण १२ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ पर्यंत एकुण ३० दिवसांचे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने मैदानी चाचणी व लेखी परीक्षा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या ०८ व्या सत्रामध्ये १५० महिला युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता. आतापर्यंत घेण्यात आलेल्या पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रहीवासी असलेल्या एकुण १३६२ युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामधुन १३२ जणांची पोलीस/एसआरपीएफ मध्ये निवड झाली आहे. या प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलाचे वतीने लोअर, टी-शर्ट, शुज, लेखी परीक्षेकरीता आवश्यक अभ्यासक्रमाची पुस्तके व इतर आवश्यक साहित्य मोफत वितरीत करण्यात आले. आज आयोजित करण्यात आलेल्या या निरोप समारंभ कार्यक्रमास पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण घेतलेले १५० महिला उमेदवार हजर होते. या प्रशिक्षणा अखेर घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविणा­या युवतींचे पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देवुन सत्कार वरिष्ठांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उमेदवारांनी पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे मनोगत व्यक्त करून गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहे.
सदर समारोपीय कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी प्रशिक्षणार्थींना आगामी पोलीस भरतीमध्ये जिद्दीने, मेहनतीने आणि चिकाटीने परिश्रम करुन यश संपादन करण्याचा संदेश दिला. यासोबतच पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांनी सर्व महिला प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
सदर पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, सर्व पोलीस अंमलदार व कवायत निर्देशक यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here