The गडविश्व
ता.प्र / अर्जुनी-मोर ( धर्मेंद्र दलाल),दि ०३ : स्थानिक नगर पंचायतीच्या वतीने अवाढव्य करवाढ केल्याने येथील नागरिकांनी नगरपंचायतीवर भव्य मोर्चा ३ जानेवारी रोजी काढण्यात आला. यावेळी शहरातील व्यापरनिही आपली बजारापेठ बंद ठेवत कारवाढी विरोधातील मोर्चात सहभाग दसर्शविला होता.
अर्जुनी ला ग्रामपंचायत होती नंतर शासनाच्या आदेशाने या गावाला नगराचा दर्जा देऊन नगरपंचायत करण्यात आले मात्र नगर पंचायतने विशेष कोणत्याच सुविधा न देता बेसुमार नविन कर वसुलीचे नोटीस दिले तसेच करासंबधी सुनावणी करुन प्रक्रीया पूर्ण करुन पेपरला जाहीर केले आहे. एवढी अवाढव्ये वाढ कोणीही नागरीक व व्यापारी सहन करु शकत नाही आणि नगरपंचायत सक्तीची वसुली करण्याची कारवाई करण्याची तयारी करत असल्याने शासनाचे अधिकारी (मुख्याधिकारी) नगरवासीयांचा विचार न करता मोठ मोठ्या महानगराचे टॅक्स (मालमत्ता कर) चे दर या नगरपंचायतनी लावुन पैसा शासन दरबारी नेण्यासाठी अर्जुनी नगरवासीयांवर अन्याय करुन लुट करण्याचा मानस दिसत दिसत असल्याने संतप्त नागरिकांनी नगरपंचायतीवर ३ जानेवारी रोजी भव्य जनआक्रोश मोर्चा काढून सदर करामध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी केली.
भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन व्यापारी संघठन व नगरवाशी नागरिक कृती समिती अर्जुनी /मोर यांनी केले होते. यावेळी स्थानिक बाजरपेठही बंद ठेवण्यात आली होती. तसेच यावेळी नगरपंचायत ने सत्र २०२३-२०२४ ते २०२६-२०२७ या वर्षासाठी नव्याने प्रस्तावीत केलेला वाढीव कर आकारणी रद्द करण्यात यावी, नवीन इमारत कर मागील वर्षाच्या कराच्या 20% च्या वर कोणत्याही परीस्थीतीत करवाढ करण्यात येऊ नये, घराच्या संपूर्ण क्षेत्रावर सरसकट कर आकारण्यात यावा, तुकडे पाडून आकारणी करु नये अशी मागणीही करण्यात आली.