The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २३ ऑक्टोबर : तालुक्यातील जि.प. शाळा कोजबी येथे इयत्ता तिसऱ्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या हृदयात छिद्र असल्याने त्यावर नागपुरातील रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. श्रद्धा सचिन दुमाने असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रमा अंतर्गत आरमोरी तालुक्यातील जि.प. शाळा कोजबी येथे तपासणी शिबिरात इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या श्रद्धा च्या हृदयात छिद्र आणि वाल मध्ये समस्या असल्याचे निदर्शनास आल्याने तिच्यावर नागपुरातील किंगस्वे रुग्णालयात २० ऑक्टोबर रोजी दाखल करण्यात आले. दरम्यान तिच्यावर २१ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया केल्यानंतर ती शुद्धीवर आली नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.