– तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्ह्याधिकारी यांना निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, १६ सप्टेंबर : शहरातील शास्त्रीनगर शेंगाव परिसरात राजेंद्र मेश्राम यांच्या घरावर जिओ टॉवर लावण्यात येत असून परिसरातील नागरिकांना त्याचा विरोध आहे. टॉवरमुळे संभाव्य धोके लक्षात घेत सदर टॉवर तात्काळ हटविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फतीने जिल्ह्याधिकारी याना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील शास्त्रीनगर शेंगाव हा परिसर दाट लोकवस्तीचा भाग आहे. त्या परिसरात आबाल वृध्द, महिला व लहान मुलांचा प्रामुख्याने वास्तव्य आहे. परंतु परिसराती राजेंद्र मेश्राम यांचे घराच्या दुसऱ्या मजल्यावर जिओ चा टॉवर बांधकामाचे काम सुरू आहे. त्या कामाच्या संबंधाने त्या परिसरातील रस्त्यावर जागोजागी खड्डे मारून रोड दुध्दा खराब झालेले आहे. राजेंद्र मेश्राम यांच्या घरावर जर जिओचे टॉवर उभारल्या गेले तर आजुबाजूच्या परिसरातील जनतेला आरोग्या संबंधाचे आजार येऊ शकतात किंवा दुसरे कोणतेही दुष्परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मेश्राम यांच्या घरावर होणाऱ्या जिओ टॉवरच्या संबंधाने आपल्या कार्यालयीन प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या परवानग्या रद्द करण्यात याव्यात व शास्त्रीनगर, शेंगाव परिसरातील मेश्राम यांच्या घरावर तयार करण्यात आलेला जिओ चा टॉवर त्वरीत हटवून योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना, सौ. सुवर्णा वासनिक, सौ. अंजुशा बंडावार, सौ. सुनंदा श्रीराम, सौ. सुनंदा ढोरे, सौ. लिला वासनिक, श्रीमती. कविता धात्रक, सौ. सुनंदा शेंडे, सौ. मिनाक्षी बारेकर, सौ. रोशनी फुलझेले, नामदेव फुलझेले, सौ. उज्वला सोंदरकर, सौ. रश्मी घोनमोडे, सौ. मिनाक्षी इटानकर, सौ. शुभांगी धंदरे, सौ. निता गडपायले, सौ. श्रध्दा कोटरंगे, साुनिता चांदेवार, शारदा खेडकर, सुषमा लांजेवार, गीता कावळे, पल्लवी भोयर, अनुसया श्रीरामे, तिलोत्मा बन्सोड, सौ. आरती पत्रे, केवळराम सिडाम, सौ. शोभा राठोड, प्रतीमा साळवे, राजेश्री मोगरकर, अदी उपस्थित होते.