– मृत्यूशी देत होता झुंज
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, १५ ऑक्टोबर : तालुका मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरजी गावाजवळ एका रानडुकराने दुचाकीस्वआरमोरी : रानडुकराच्या धडकेत जखमी झालेल्या इसमाचा अखेर मृत्यूरास धडक दिल्याने चालकाला गंभीर दुखापत झालेली होती. दरम्यान जखमी अवस्थेत त्याला ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात भरती केले असता तीन दिवसानंतर अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
रामपूर चक येथील युवक नितेश राऊत हा आरमोरी येथून गावाकडे सायंकाळच्या सुमारास जात असताना अचानक रस्त्यावर डुक्कर आडवा आल्याने दुचाकीला धडक बसली. यात नितेश राऊत हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मेंदूला जबर मार लागला असल्याने तीन दिवस तो कोमातच होता. शेवटी काल १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. एक युवक आपल्यातून कायमचा गेल्याने गावात हडळ व्यक्त करण्यात येत आहे. नितेश राऊत युवक हा शिवनी (बु) येथील रहिवासी असून तो बऱ्याच वर्षापासून मामाकडे रामपूर येथे राहत होता. अचानक अपघाती मृत्यू झाल्याने वन विभागाकडून काही मदत मिळते का अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरीही अशा जंगली जनावरांच्या हल्ल्यात किंवा त्यामुळे झालेल्या अपघातात वन विभागाने थोडी तरी मदत देण्यात यावी अशी जनतेकडून मागणी होत आहे . गावातील सुज्ञ नागरिक सदर प्रकरणाची दखल घेऊन वन विभागाकडे मदतीची मागणी करीत आहेत.(the gdv, the gadvishva, Gadchiroli News Updates, accident, 2023 News)
