The गडविश्व
आरमोरी, दि. ०५ : महाराष्ट्र राज्य अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना (स्वयंपाकी, कामाठी, मदतनीस) संघटनेची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. यात गडचिरोली प्रकल्पाच्या प्रकल्प अध्यक्षपदी जितेंद्र रघुनाथ दोडके यांची तर सचिवपदी तेजस पटवारी घुटके यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
गडचिरोली प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या विविध समस्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस अध्यक्ष जितेंद्र दोडके व सचिव तेजस घुटके यांनी व्यक्त केला. संघटनेच्या वतीने करावयाच्या सामाजिक कार्याचीही यावेळी माहिती देण्यात आली.