The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, दि.२७ : येथील माँ जिजाऊ महिला बचत गटाच्या वतीने नंदनवन कॉलनी येथे २६ नोव्हेंबर रोजी सामूहिक तुळसी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
मागील पाच वर्षापासून नंदनवन कॉलनी येथे माँ जिजाऊ महिला बचत गट च्या वतीने आयोजित केला जातो. कॉलनीतील घराघरातून तुळशी वृंदावन जमा केले जातात. कॉलनीतील महिला मंडळ आपापली तुळशी वृंदावणे मोठ्या उत्साहाने साजशृंगार करून येथे आणतात. सायंकाळी महिला पुरुषांच्या उपस्थित तुळशी विवाह सोहळा पार पाडण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली विवाह नंतर लगेच येथील नागरिकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. माँ जिजाऊ महिला बचत गट नेहमीच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करतात. या सामूहिक विवाह सोहळ्यातून सामाजिक एकोप्याचा संदेश निर्माण होतो.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल्का मेश्राम, निलिमा लाकडे, वनिता डोकरमारे, श्रेया कोटरंगे, प्रीती सोनकुसरे, पुष्पा बोरकर, रिना मने, वैशाली ढोरे, अश्विनी मेश्राम, सुलभा डोके,दीप्ती कोलते, उज्वला पारधी, अर्चना जाधव , सरोज म्हस्के , कुंदा जाधव तसेच येथील सर्व पुरुषांनी सहकार्य केले.