आरमोरी : महिलेचा बळी घेणारी टी-१३ वाघीण जेरबंद

1785

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २३ ऑक्टोबर : तालुका मुख्यालयापासुन अवघ्या ५ किमी अंतरावरील रामाळा परिसरात दहशत असलेल्या वाघाला अखेर वनविभागाने २३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास जेरबंद केले.
आरमोरी परिसरात वाघांचा संचार असुन नुकताच तिन दिवसांपूर्वी रामाळा परिसरात वाघाने ताराबाई धोडरे नामक ६० वर्षीय महिलेला शेतात काम करत असतांना टी-१३ वाघिनेने ठार केले होते. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. यावेळी नागरिकांनी वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी केली होती. वनविभागाने त्याच दिवसांपासून वाघास जेरबंद करण्यास पाळत ठेवली होती.तीला पकडण्यासाठी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ता.अं.व्या.प्र. चंद्रपुर व शुटर अजय मराठे यांची चमु आरमोरी परिक्षेत्रात दाखल झाली. वाघीनीला जेरबंद करण्यासाठी सापळा रचुन कॅमेरा ट्रॅप लावुन अवघ्या तीन दिवसात वाघिणीला वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र रवि मधिल सव्हें क्रमांक १२/१ मध्ये जेरबंद केले. वाघीनीला आता गोरेवाडा TTC इथे नेण्यात येणार असून वाघिणीला जेरबंद केल्याने नागरिकांनी एकच निश्वास सोडला आहे.
सदरची कार्यवाही एस. रमेशकुमार, वनसंरक्षक, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धर्मविर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक वडसा,
संदिप भारती, सहाय्यक वनसंरक्षक, वडसा वनविभाग, वडसा  पवनकुमार जोंग, परिविक्षाधीन (भा.व.से.), वनपरिक्षेत्र अधिकारी, आरमोरी, अविनाश मेश्राम, वपअ आरमोरी (सलग्न), राजेंद्र कुंभोर, क्षेत्र सहाय्यक आरमोरी, अजय उरकुडे, पाटील, साखरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रकल्प चंद्रपुर मधिल चमु मध्ये दिपेश टेंभुर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने,  प्रफुल वाटगुरे, निकेश शंदे, मनान शेख तसेच गडचिरोली RRT चमु दलातील डॉ. आशिष भोयर, अजय कुकडकर,  मकसुद सय्यद, गुणवंत बावनथडे, पंकज फरकडे, निखील बारसागडे व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.

(The Gadvishva, Tha GDV, Gadchiroli News Updates, Forest Armori,Tiger Attack)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here