The गडविश्व
गडचिरोली, १९ एप्रिल : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात २२ एप्रिलला संधिवात ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संधिवाताच्या आजाराची अनेक लक्षणे आहेत जसे -सांधे, स्नायू, हाडे यांच्या आसपास वेदना, सूज आणि/किंवा कडकपणा, मान आणि पाठदुखी,प्रदीर्घ ताप, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा येणे, वारंवार तोंडात फोड येणे, केस गळणे, प्रकाश संवेदनशीलता. हात, पाय, चेहरा, छाती किंवा पोटावर त्वचा घट्ट होणे. डोळे आणि तोंड कोरडे पडणे, थंड स्थितीत बोटे/ हाताचे पंजे निळे किंवा पांढरे होणे,जिने चढल्याने स्नायू कमकुवत होणे. संधिवात ओपीडी या महिन्याच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येत असून, शनिवार २२ एप्रिल २०२३ ला डॉ. सलिल गणू (Rheumatologist – संधिवात विकारतज्ञ)यांच्याकडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल. या सुविधेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात आला आहे.
(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (PSG vs Lens) (News today) (Ashraf Ahmed) (Breaking News) (Femina Miss India 2023) (Atiq Ahmed)