चंद्रपुरात तब्बल ९०६ किलो अंमली पदार्थाची होळी

217

– पोलिसांतर्फे जनजागृती प्रभातफेरी
The गडविश्व
चंद्रपूर, २७ जून : दरवर्षी 26 जुन हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन पाळला जातो. नशेच्या आहारी गेलेल्या लोकांचे जीवन वाचवणे, प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली यांच्यामध्ये अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत जागरुकता करणे, या उद्देशाने जिल्हा पोलिस दलातर्फे जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली.
विशेष म्हणले जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये दाखल गुन्हयातील अंमली पदार्थ (गांजा, डोडा पावडर व टरफल) असा एकूण 906 किलो 962 ग्रॉम अंमली पदार्थाची होळी करण्यात आली.
तत्पूर्वी गांधी चौक येथून जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक रविंद्रसिह परदेशी, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधु, पोलिस उपअधीक्षक राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलिस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) महेश कोंडावार, सतिश राजपुत (शहर पोलिस स्टेशन), राजेश मुळे (रामनगर पोलिस स्टेशन), अनिल जिट्टावार (दुर्गापूर पोलिस स्टेशन), शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक रोशन यादव, प्रविण पाटील, तसेच ‘सी-60’ पथक, दंगा नियंत्रण पथक, वाहतुक शाखा, यांच्यासह पुरष व महिला पोलिस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर जनजागृती प्रभारी रैली शहरातील महात्मा गांधी रोड मुख्य मार्गाने जटपुरा गेट, सावरकर चौक मार्गे पोलिस मुख्यालय चंद्रपूर येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला.

अंमली पदार्थाची होळी

चंद्रपूर मुख्यालय येथे रॅलीचा समारोप झाल्यानंतर जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन अंतर्गत एन.डी.पी.एस. ॲक्ट अन्वये दाखल गुन्हयातील अंमली पदार्थ (गांजा, डोडा पावडर व टरफल) असा एकूण 906 किलो 962 ग्रॅम अंमली पदार्थ न्यायालयाच्या परवानगीने पंचासमक्ष पोलिस मुख्यालय येथे जाळुन नाश करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here