The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ३१ : शासकीय धान्य दुकानातील ई-पास मशीन मध्ये बिघाड असल्याने ऑफलाईन धान्य वितरणाचा शासकीय आदेश निघाला असतानाही धान्य वितरणास नकार देणाऱ्या विक्रेता व प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत येथील नगरसेवकांनी त्यांना धारेवर धरल्यानंतर अखेर सर्व लाभार्थांना अन्न धान्य वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यासह जिल्ह्यात सूद्धा ई पास मशीन मध्ये तांत्रिक बिघाड असल्याने लाभार्थांना जूलै महिण्याची ऑनलाईन अन्न धान्य वितरण प्रक्रिया रखडलेली आहे. शासनाने कालच ऑफलाईन धान्य वितरणाचा आदेश काढलेला आहे मात्र आज महिण्याचा अंतिम दिवस असतानाही येथील राणाप्रताप वार्डातील शासकीय धान्य विक्रेता आदेश नसल्याची सबब सांगत लाभार्थांना धान्य देण्यास नकार देत होता. त्यामूळे संतप्त लाभार्थांना सोबत घेत येथील शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे व नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल यांनी विक्रेत्याच्या दुकानावर धडक दित जाब विचारला यावेळी विक्रेत्याच्या सबबीने समाधान न झाल्याने तिथूनच तहसीलदार रमेश कूंभरे यांना भ्रमनध्वनीवर संपर्क करीत लाभार्थांची होणारी अडचण व निर्माण झालेली परिस्थिती त्यांना सांगण्यात आली. त्यानी लगेच पूरवठा निरीक्षक समाधान तायडे यांना तिथे पाठविले. यावेळी पदाधिकारी व लाभार्थांचा रौद्ररूप लक्षात घेत तायडे यांनी शासनाचा ऑफलाईंचा आदेश निघालेला आहे हे मान्य करीत विक्रेत्याला सर्व लाभार्थाना ऑफलाईन धान्य वितरणाची सूचना केली यानंतर सर्व लाभार्थाना धान्य वितरण करण्यात आल्याने त्यानी समाधान व्यक्त केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )