गडचिरोली शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आशिष धात्रक सचिवपदी देवेंद्र लांजेवार

122

– पतसंस्थेवर शिक्षक मित्र पॅनलचे वर्चस्व
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : नुकताच झालेल्या गडचिरोली शिक्षण सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली र.न 1171 ची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये शिक्षक मित्र पॅनलने दणदणीत यश मिळवून तब्बल १२ संचालक निवडून आणले तदनंतर आज झालेल्या पदाधिकारी निवडीत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना पतसंस्थेच्या सर्व पदावर शिक्षक मित्र पॅनलचे उमेदवार विजयी झाले त्यात अध्यक्ष आशिष धात्रक, सचिव देवेंद्र लांजेवार, उपाध्यक्ष नीलकंठ आवारी, खजिनदार श्रीमती रजनी कुमरे या पदाधिकाऱ्याची निवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला व नवनियुक्त पदाधिकारी यांनी सभेला मार्गदर्शन करताना सभासदाच्या विश्वासाला अनुसरून कार्य करण्याची ग्वाही दिली.
सदर निवडणूक प्रक्रिया सुशील वानखेडे निवडणूक प्रदीप अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पार पडली तर हं.सू कमलापूरवार अनिकेत कायरकर, सचिन कुनघाडकर यांनी सहकार्य केले. यावेळी शिक्षक मित्र पॅनलचे व प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभासद सरिता पोरेटी,अंजुम शेख, उषा बोरकर, स्मृती कुडकावार, लीना धात्रक, जयश्री कापकर, भाग्यश्री धात्रक, वर्षा नाकाडे, जगदीश मडावी, नितीन कुंभारे, सागर आत्राम, राकेश चचाणे, प्रवीण धाडसे, खु्मेंद्र मेश्राम, सचिन मेश्राम, रमेश काळबांडे, गौतम पुंडगे, जनार्धन नैताम, संतोष धानोरकर, युवराज तांदळे, यशवंत उईके, खुशाल भुरसे, विद्या ठाकरे, नालंदा इंदूरकर, संगीता लाकडे, यामिनी कोवे, मंगेश गड्डेवर, पुरुषोत्तम चिमुरकर, आशा दाकोटे, बेबी सहारे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here