बेलगाव रस्त्यावरील डांबरीकरण उखडले, दुरुस्ती कडे विभागाचे दुर्लक्ष

21

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३१ : तालुक्यातील रांगी आणि गडचिरोली तालुक्यातील बेलगाव यातील ६ किमी अंतरावरील डांबरीकरण पूर्णपणे उघडले असून या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, भेगा सुद्धा पडलेल्या असल्याने रोडवर पुरता गिट्टी पडल्याचे दिसून येते आणि झाडे वाकलेली असल्याने या ठिकाणाहून मार्ग काढताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दत्त मंदिर (पहाडी ) ते मोहटोला या गावाच्या मध्यंतरी मोरी बांधकाम खुपचं जुने असल्याने अर्धे खचलेले असून काही भाग जमिनदोस्त असुन रोडला भेगा सुद्धा केलेले आहेत. या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी खड्ड्यामुळे या मार्गावर गेल्या काही दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रांगी ते बेलगाव वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. गडचिरोली जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनाचे ये-जा सुरू असते. सदर मार्गाने जिल्ह्याचे ठिकाण जवळ येत असल्याने जिल्ह्याच्या कामाकरता अवजड वाहनांची गडचिरोलीकडे ये जा नेहमी सुरू असते मात्र रांगी ते बेलगाव ६ किलोमीटर च्या तराची प्रचंड दुरावस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास धोकादायक बनला आहे. त्यामुळे सदर मार्गाची पक्की दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी रांगी परिसरातील लोकांनी केली आहे. सदर मार्गाची अवस्था बकाल झाल्याने रांगी वरून गडचिरोलीकडे जाण्यासाठी बराच अवधी लागत आहे. वाहन धारकांना पाठीच्या मनक्याचा, कमरेचा त्रास सुरू झाला तरी पण मार्ग दुरुस्तीच्या कामाकडे बांधकाम विभाग लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. पावसामुळे रस्त्यावर वाकलेल्या झाडाकडे वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. गडचिरोली येथे विविध कार्यालय, रुग्णालय, बँक, महाविद्यालय, व्यावसायिक इतर खरेदी अशा विविध कामासाठी रांगी परिसरासह, कुरखेडा, सोन्सरी ,देलणवाडी,मानापुर, मोहलि येथील नागरिक विद्यार्थी याच मार्गाने आवागमन करतात. जिल्हा मुख्यालयावरून अनेक अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी याच मार्गाने ये-जा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here