प्रशांत साळवे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

270

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २४ सप्टेंबर : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत आयोजित कार्यक्रमात धानोरा जिल्हा परिषद हायस्कूल येथील शिक्षक प्रशांत विठ्ठलराव साळवे यांना अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन जिल्हास्तरीय आर्दश‌ शिक्षक पुरस्काराने २२ सप्टेंबर ला गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे गौरविण्यात आले.
यावेळी मंचावर आमदार कृष्णा गजबे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, मुख्यकार्यकारी अधिकारी आरुषी सिंह, माजी जिल्हा परिषद कृषि सभापती नाना नाकाडे, राँका जिल्हाध्यक्ष वासेकर, अतिरिक्त मुख्यकार्यकारीअधिकारी, आर.एम.भुयार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस एम शेलार, धनंजय चापले प्राचार्य डायट गडचिरोली, जलजिवन मिशन प्रकल्प अधिकारी फरेंद्र कुत्तिरकर, विवेक नाकाडे शिक्षणाधिकारी (प्राथमिक )आदि मान्यवर उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षक विभागात ऐकून ४ प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यामधे प्रशांत विठ्ठलराव साळवे जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा यांची निवड करण्यात आली. कार्यक्रम सन २०२३ -२४ या वर्षात त्यांना प्रदान करण्यात आला. प्रशांत साळवे हे मुळचे धानोरा तालुक्यातील रांगी येथील रहिवासी आहेत. ग्रामीण भागात राहुन सुद्धा मागिल १९ वर्षा पासुन विद्याज्ञानाचे कार्य करीत आहेत. त्यापैकी १२ वर्ष मोहली येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते चांगले नाट्यकलावंत सुदधा आहेत. त्याची उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख आहे. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची गुणवंत वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून इतिहासाची ओळख करून देतात. गणिताचे हाडामासाचे शिक्षक आहेत. हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करतात. विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत गणित विद्यार्थ्यांच्या गळी उतरवत असतात. सोबतच समाज सेवेची आवड असून त्यांच्या ऐकूनच कार्याची दखल घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेने सन २०२२-२३ या वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना गडचिरोली येथील नियोजन भवन येथे सन्मानित केले आहे.
त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बदल व्ही.आर. अरवेली गटशिक्षाधिकारी प.स.धानोरा, शाळेचे मुख्याध्यापक व्हीं.एम. सूरजूसे, प्रभाकर खोबरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग, शालेय कर्मचारी वर्ग,विद्यार्थी व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here