The गडविश्व
नागपूर, दि. २३ : भारताच्या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने भारत भरातील तिच्या ५४३० पेक्षा अधिक शाखांमधील ज्येष्ठ नागरिक ग्राहकांचा सत्कार करून ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा केला. या विशेष दिनाचा एक भाग म्हणून ॲक्सिस बँकेने त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड, सीस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs), मुदत ठेवी (TDs) आणि इतर विशेष वित्तीय सेवांसारख्या सर्वोत्तम उपलब्ध गुंतवणूक पर्यायांबद्दल माहिती देत जागरूकता वाढविली.
नबँकेने ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना त्याच्या “सिल्व्हर लाइनिंग प्रोग्राम”बद्दल माहिती दिली, वृद्धांच्या बँकिंग गरजा पूर्ण करण्यासाठी क्युरेट करण्यात आलेल्या ऑफर्सचा हा एक सर्वसमावेशक संच आहे.
समर्पित रिलेशनशिप मॅनेजर
अपोलो फार्मसीवर 15% पर्यंत सूट आणि अनेक निदान केंद्रांवर 20% पर्यंत सूट
ॲक्सिस बँकेच्या मुदत ठेवींवर 0.75% पर्यंत जास्त व्याजदर
बुकिंगमध्ये मदत करण्यासाठी ट्रॅव्हल एज कॉन्सिअर्ज सेवेसह ट्रॅव्हल एज मार्गे फ्लाइट बुकिंगवर विशेष भाडे आणि शून्य सुविधा शुल्क.
ट्रॅव्हल एजद्वारे देशांतर्गत फ्लाइट तिकिटांवर मोफत रु.1500 व्हाउचर
मोफत 6 महिने Sony Liv सदस्यत्व
या प्रसंगी अर्निका दीक्षित, प्रेसिडेंट आणि हैड – शाखा बैंकिंग म्हणाल्या, “आमच्या ग्राहकांना केवळ आर्थिक सेवा देण्यापलीकडेही आपले त्यांच्याशी नाते असते, असे आम्ही मानतो. हा उपक्रम समाजाचा कणा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांप्रति आदर आणि वचनबद्धता प्रतिबिंबित करतो. भावी पिढ्यांसाठी एक मजबूत इकोसीस्टम तयार करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे आणि आता त्यांचे हे ऋण फेडणे व त्यांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी सानुकूलित उत्पादनांसह, त्यांना सोईस्कर आणि अखंड बँकिंग अनुभव प्रदान करून, जीवनाच्या या टप्प्यावर त्यांच्या सर्व गरजा व आवश्यकता पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे.”
हा दिवस साजरा करण्यासाठी, ॲक्सिस बँकेने आपल्या आरोग्य आणि सामान्य विमा भागीदारांसोबत ॲक्सिस बँकेच्या निवडक शाखांमध्ये सोय केली आहे. ज्यायोगे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजिटल आरोग्य तपासणी, यात बॉडी मास इंडेक्स (BMI), रक्तदाब, ऑक्सिजन संपृक्तता, हृदयगती, श्वासोच्छवासाचा दर याची तपासणी होईल. याशिवाय, ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्म Optimists द्वारे औषधांच्या खरेदीवर 21% पर्यंत सूट सारखी विशेष ऑफर बँकेने जाहीर केली आहे.