एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून ॲक्सिस बँकेचा‘ ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ उपक्रमासाठी सन्मान

535

The गडविश्व
मुंबई, दि. २३ : भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेला ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ या देशव्यापी स्वच्छता मोहिमेसाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे नावाजण्यात आले आहे. ॲक्सिस बँकेला एशिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे ‘एका आठवड्यात विविध पर्यटन स्थळांवरून सर्वाधिक टन कचरा गोळा करणे’ आणि ‘एका आठवड्यात सर्वाधिक प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ करणे’ अशा दोन कार्यप्रकारांनी सन्मानित करण्यात आले. निसर्ग संवर्धनासाठी बँकेच्या उल्लेखनीय योगदानाची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दखल घेण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. या कामगिरीतून बँकेचे पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाप्रतीचे समर्पण दिसून येते.
ॲक्सिस बँकेने ५ जून ते १२ जून २०२४ या कालावधीत आयोजित केलेल्या आठवडाभराच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान २४ स्वयंसेवी संस्थांसोबत हातमिळवणी केली आणि वाराणसी घाट, दिल्लीतील कुतुबमिनार, आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, हैदराबादमधील गोवळकोंडा किल्ला, शिमल्यातील मॉल रोड इ. सारख्या तेवीस पर्यटन स्थळांवरून जवळपास १३,००० किलो कचरा गोळा केला. शाखा कर्मचारी, ग्राहक, पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक प्राधिकरणांसह सुमारे ४,६४९ स्वयंसेवकांनी ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ मोहिमेत उत्साहाने भाग घेतला.
या उल्लेखनीय कामगिरीबाबत भाष्य करताना ॲक्सिस बँकेच्या प्रेसिडेंट आणि हेड, ब्रांच बैंकिंग, सुश्री अर्निका दीक्षित म्हणाल्या,“ॲक्सिस बँकेमध्ये आम्हाला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविल्याचा खूप अभिमान वाटतो. ही रेकॉर्ड्स म्हणजे नागरी जबाबदारी, समाजसेवा आणि पर्यावरणीय संवर्धनासाठी असलेल्या आमच्या समर्पणाचे प्रतीक आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ही नयनरम्य पर्यटन स्थळे आणि वारसा स्थळांचे जतन करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमची संपूर्ण भारतभरातील मोहीम भावी पिढ्यांसाठी आमच्या वसुंधरेचे रक्षण करण्याच्या आमच्या बांधिलकीला बळकट करते. पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलनाला चालना देण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याकरिता त्यांना प्रोत्साहन देते.
गेल्या वर्षी ॲक्सिस बँकेने भारतातील १८ शहरांमधील पंचवीस जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी देशव्यापी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. त्यामध्ये ३,७०० हून अधिक सहभागींनी १२,७९४ किलो कचरा गोळा केला होता. ‘आठवडाभर चाललेल्या स्वच्छता मोहिमेदरम्यान जास्तीतजास्त पाणवठे स्वच्छ करणे’ आणि ‘विविध शहरांमधील जलकुंभांमधून जास्तीतजास्त किलोग्रॅम कचरा गोळा करणे’ यासाठी या उल्लेखनीय प्रयत्नाला एशिया बुक ऑफ रेकॉर्डने नावाजले होते. आपल्या विस्तृत नेटवर्कचा लाभ घेऊन, ॲक्सिस बँक येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित भविष्य घडविण्याचा प्रयत्न करते. जागतिक पर्यावरण दिन २०२४ रोजीचे ॲक्सिस बँकेचे उपक्रम कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकास यासाठी असलेली सातत्यपूर्ण बांधिलकी प्रतिबिंबित करतात.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #mumbai)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here