आझाद समाज पार्टी ची कुरखेडा कार्यकारिणी गठीत

222

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १२ : आझाद समाज पार्टी चीं कुरखेडाची कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे.
येथील विश्रामगृहात कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिखराम यांच्या नेतृत्वात व पक्षाचे प्रभारी धर्मानंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेष अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद मडावी, प्रवक्ते प्रितेश अंबादे, गडचिरोली शहराध्यक्ष नागसेन खोब्रागडे, जिल्हा मीडिया प्रमुख सतीश दुर्गमवार उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील रस्ते, शाळा, गावातील हॉस्पिटल, घरकुल, रोजगार हमीचा थकीत निधी अशा विविध समस्यावर चर्चा व मार्गदर्शन करुन वरच्या स्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. लवकरच वडसा, आरमोरी, कोरची मध्ये शाखा तयार करून वडसा येथे कार्यकर्ता मेळाव्यात उमेदवाराची घोषणा करणार असल्याचे प्रभारी धर्मानंद मेश्राम यांनी सांगितले. तसेच पक्षामध्ये नविन आणि सुशिक्षित तरुणांना संधी देण्याचा काम आम्ही करु असे प्रतिपादन आसपा चे कार्याध्यक्ष विनोद मडावी यांनी सांगितले.
कुरखेडा कार्यकारिणीमध्ये जिल्हा सचिव पदी – कुणाल मच्छीरके, आरमोरी विधानसभा अध्यक्ष – सचिन गेडाम, तालुका कार्याध्यक्ष पदी – दिलीप सहारे, तालुका उपाध्यक्ष – लोकेशजी लाडे, तालुका सचिव – प्रशांत मेश्राम, तालुका मीडिया प्रमुख – प्रणित उके, कुरखेडा शहराध्यक्ष- धनंजय सहारे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे सदस्य म्हणून अंकुश कोकोडे, प्रवीण कोवाची,भीमराव शेंडे, वाल्मिक लाडे, दिनेश जांभुळकर, प्रल्हाद रामटेके, रवींद्र कुमरे, नानाजी वालदे, किशोर टेम्भूर्णे, अतुल सिड्राम, गणेश मडावी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here