– जीव मुठीत घेऊन चालवितात वाहन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १० जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका आदिवासी बहुत असून नक्षल प्रभावित तालुका म्हणून ओळख असलेल्या धानोरा ते मुरूमगाव मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सदर मार्गावरती मोठ मोठे खड्डे पडून सध्या स्थिती धानोरा ते मुरूमगाव मार्गाची हालत गंभीर झाली आहे. या मार्गावरून अनेक वाहनधारक आपला स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करतानाचे चित्र आहे. चारचाकी, दुचाकी व इतर वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते तसेच प्रवासी सुद्धा त्रस्त झाल्याने संबंधित विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
धानोरा ते मुरूमगाव मार्ग छत्तीसगड राज्याला जोडलेला असून मुरुमगाव भागातील अनेक नागरिक दररोज धानोरा येथे तहसील, बँक, कार्यालयातील कामकाजाकरिता तसेच व्यापारी, व्यवसायिक कामा करिता दररोज ये -जा करावी लागते. परंतु अलीकडेच आलेल्या पावसाने रस्ता पूर्णपणे फुटून गेल्याने जागोजागी मोठे खड्डे पडल्याने अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. दुचाकी चार चाकी वाहनधारकांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. अशा खड्ड्यांमध्ये वाहन केल्यास दुर्घटना होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात असल्याने संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन मार्ग दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील वाहनधारकांनी केली आहे.