– हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी व्यक्त केली चिंता
The गडविश्व
चंद्रपूर, दि. ३० : बल्लारशाह -गोंदिया रेल्वे रुळावर मागील १३ दिवसात ४ अस्वलीचा मृत्यू झाला असून आता आणखी एका नर अस्वलीचा चिचपल्ली स्टेशन जवळ रेल्वे च्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. सदर मार्ग हा वन्यप्राण्यांना मृत्यूचा सापळा ठरत असून वन्यप्राण्यांच्या अशा मृत्युने हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीचे दिनेश खाटे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
वनविकास महामंडळाच्या चिचपल्ली-जुनोना वनक्षेत्रात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. लोहार जंगलातील १९ जुलै ची रेल्वे अपघातात अस्वलीचा मृत्यूची घटना ताजी असतांना पुन्हा त्याच रेल्वे रुळावर चिचपल्ली येथे अस्वलीचा रेल्वेच्या अपघातात मृत्यू झाला, तर अर्जुनी मोरगाव क्षेत्रात २ अस्वलीचा मृत्यू झाला होता.
वन्यजीवांचे भ्रमणमार्ग असून बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर उपशमन योजना का राबविण्यात येत नाही आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, लोहारा, केळझर, नागझिरा ह्या वनक्षेत्रात रेल्वे रुळावर वाघांचा मृत्यू झाला होता. नुकतीच मध्यप्रदेश ची बुधनी भागात वाघांच्या पिल्लांचा मृत्यू झाला होता. अनेक भागात ज्या जंगलातून रेल्वे जात आहे तिथे उपशमन योजना राबविण्यात यायला पाहिजे होत्या. रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारचे पाऊल का उचलल्या जात नाही आहे. वनविभाग सुद्धा बघ्याची भूमिका न घेता त्यांनी सुद्धा रेल्वे प्रशासनाला उपशमन योजना राबवा अथवा रेल्वे जंगलातून जाऊ देणार नाही अशी भूमिका घ्यायला हवी. ताडोबा-अंधारी लगतच हा भाग असून कावल व्याघ्र प्रकल्प, कन्हाळगाव अभयारण्य, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडला यांचा हा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग आहे. अति महत्वाचा भ्रमणमार्ग असतांना वन्यजीवांचे मृत्यू न रोखणे हि लाजिरवाणी बाब आहे. कुठल्याही उपाय योजना न करणे, जंगलातून वेळेची बचत करण्यासाठी एक्सप्रेस सोडणे, जंगलातून वेगाची मर्यादा न राखणे हे वन्यजीवांच्या मृत्यू चे कारण ठरत आहे असे हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी चे दिनेश खाटे यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाला बल्लारशाह-गोंदिया ह्या जंगल परिसरातून एक्सप्रेस बंद करण्यात यावी, रात्री वेग मर्यादेचे पालन करावे जे आता रेल्वे प्रशासन करत नाही आहे, रात्री शक्यतो रेल्वे बंद करण्यात याव्या ज्यामुळे वन्यजीवांचे अपघाताला आळा बसेल अशी मागणी हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.
दरम्यान घटना स्थळी हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटी दिनेश खाटे, नाजिश अली, अमित देशमुख,राहील अली वनविकास महामंडळाचे सहाय्यक वनसंरक्षक कदम, वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, चंडोलकर रेल्वे विभाग चे देशकर उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #chandrpuenews )