The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. १४ : विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत उराडी येथे ०९ डिसेंबर २०२३ रोजी ग्रा.पं. कार्यालय उराडी येथे सकाळी ९.३० वा. रथ यात्रेचे आगमन झाल्या नंतर रथ यात्रेचे आदिवासी संस्कृती नृत्य व लेझीम द्वारे मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष म्हणून आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कुरखेडाचे तहसीलदार घनबाते, भाजप कुरखेडा चे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, पाटील गट विकास अधिकारी कुरखेडा, कृषी अधिकारी रामटेके, उसेंडी मंडळ अधिकारी कुरखेडा, कुळमिथे वनरक्षक उराडी, राउत तलाठी, बांबोळे, मारेकरी, सरपंच सोनी वट्टी, विजय सोमवंशी ग्रा.प. सदस्य, राजेंद वही ग्रा.प, सदस्य, सौ.सपना पेंदाम ग्रा.प. सदस्या, सौ.जयमाला टिकले ग्रा.प. सदस्या, सौ. सुरेखा गायकवाड ग्रा.प, सदस्या, सौ. वर्षा कोकोडे माजी पं.स.सदस्या कुरखेडा, टेटू पाटील नाकाडे, दत्तात्रय क्षिसागर महाराज, पुस्तोडे, युवराज मरसकोल्हे, मोतीरामजी नाहामुते, सुरेश चौधरी, गोपीनाथ पाटील सुकारे, चरणदास कोकोडे, गोमाजी करंगगामी, सुनिल चौधरी, बंडूजी मेश्राम, भास्कर वैरागडे पो. पा, गणपतीजी चौधरी, जयपाल नागोसे, गणेश शेंडे, नंदेश्वर तोफा, प्रमोद चौखे, राजेंद्र दडमल, सौ कविता दडमल तसेच जि प शाळा येथील सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद व कुथे पाटील विद्यालय येथील विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी विकसित भारत संकल्प यात्रा या कार्यक्रमात सहभाग घेतला व या कार्यक्रमा प्रसंगी ‘मेरी जुबानी मेरी कहाणी’ हे उपक्रम घेण्यात आले. उत्कट खेळाडू, सुदृढ बालक, उत्कृष्ट कलावंताचे सत्कार करण्यात आले.