The गडविश्व
अहेरी, ८ जानेवारी : ग्रामपंचायत गुरुपल्ली अंतर्गत लाखो रुपयांच्या विकास कामांचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पूनागुडा येथे नाली बांधकाम, सिमेंट काँक्रीट रोड, जवेली येथे जि.प.शाळेची नवीन इमारत, जि.प.शाळेची दुरुस्ती, नवीन नाली बांधकाम, डुंमे येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. ग्रा.पं.गुरुपल्ली अंतर्गत या गावात जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला. येत्या काही दिवसांत नाली बांधकाम, सिमेंट काँक्रीट रोड, जवेली येथे जि.प.शाळेची नवीन इमारत, जि.प.शाळेची दुरुस्ती, नवीन नाली बांधकाम, डुंमे येथे नाली बांधकाम पूर्ण होणार आहे. आज जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्य हस्ते सदर बांधकामाचे भूमिपूजन पार पडले.
या भूमिपूजनाला गुरुपल्ली चे सरपंच कैलाश उसेंडी, उपसरपंच बाळू आत्राम, सदस्य सत्तू गावळे, सदस्य संगीत पुंगाटी, आविस एटापल्ली सचिव प्रज्वल नागुलावार, गेदा ग्रा.पं. सदस्य तथा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश वैरागडे, पोलीस पाटील अजय गावळे, अनिल करमरकर, देवतळे काका, हेमंत मलिक, संतोष इसंकर, राहुल बिरमवार, जुनेद शेख, गाव पाटील मासू उसेंडी, बिरसु कादो, कार्तिक तलांडे, जयराम इस्टाम, शामराव उसेंडी, गोपिका वेलादी, पपिता मेश्राम, अनिता आत्राम, गावातील नागरिक उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Ajay Kankadlawar)