The गडविश्व
चिमूर / नेरी, १९ सप्टेंबर : चिमूर तालुक्यातील महादवाडी गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या हरणी ते पॉवर स्टेशन खांबाडा पर्यंत ३ किलोमीटर डांबरीकरण रोडचे भूमीपूजन व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस श्रीहरी सातपुते यांचे हस्ते संपन्न झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या महादवाडी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या हरणी गावातील नागरिकांसाठी हरणी ते खांबाळा पॉवर स्टेशन पर्यंत पक्का रस्ता निर्माण व्हावा याकरिता महादवाडी ग्राम पंचायतचे सरपंच भोजराज कामडी यांनी नागरीकांसोबत उपोषण केले होते. या उपोषणाला शिवसेना, प्रहार या संघटनांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची दखल मीडियाने घेतली होती. त्याची फलश्रुती सार्वजनिक बांधकाम विभागाने हरणी ते खांबाडा पावर स्टेशन पर्यंत ३ किलोंमीटर रोडची मंजुरी दिली. या रोडचे भूमिपूजन महादवाडी ग्राम पंचायत सरपंच भोजराज कामडी यांचे उपस्थित व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस श्रीहरी सातपुते यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार जावेद पठाण हरणी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राम पंचायत सरपंच भोजराज कामडी, ग्राम पंचायत सदस्य चरणदास दडमल सोबत गावातील नागरिक रंगराव नवघरे. इंद्रजित लोगडे, अनिल मारोती खाटीक, पुरुषोत्तम खाटीक, रुपचंद मेश्राम, विलास भागडे, हिरामण भागडे, अमोल भागडे, जनार्धन भागडे, गोविंदा मेश्राम, बापूदास चिनूरकर, उद्धव ननावरे, रतीराम श्रीरामे आदी नागरिक उपस्थित होते.