मोठी बातमी : शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला

770

– उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, निवडणूक आयोगाने दिला निकाल
The गडविश्व
मुंबई, १७ फेब्रुवारी : शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे कोणाला मिळणार असे अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. आज अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाने ठाकरे तसेच शिंदे गटाला आपआपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन्ही गटांना पदाधीकारी तसेच पक्षातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले दिले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असलेली कागदपत्रं निवडणूक आयोगासमोर सादर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here