दोन हजारच्या नोटाबद्दल आरबीआयची मोठी अपडेट

1106

– आरबीआयने दिली नवी डेडलाईन
The गडविश्व
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवली आहे. तर उद्यापासून २००० रुपयांच्या नोटा (Rs. 2000 notes) व्यवहारात वापरता येणार नाहीत. बँकेत नोटा जमा करण्याची मुदत आरबीआयने वाढवली आहे.
आज रिझर्व्ह बँकेने परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. आता, नागरिकांना त्यांच्याकडील दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आणखी सात दिवसांची मुदत मिळाली आहे.
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी अजूनही २००० रुपयांच्या नोटा बदलल्या नसतील त्यांना आता ७ ऑक्टोबरपर्यंत नोटा बदलता येणार आहे. एकाच वेळी कमाल २० हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयनुसार, २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत ९६ टक्के २००० रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. १९ मे २०२३ रोजी २००० रुपयांच्या ३.५६ लाख कोटी मूल्याच्या नोटा चलनात होत्या. त्यानंतर आतापर्यंत ३.४२ लाख कोटी रुपये मूल्य असणाऱ्या नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत.
आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून बँकांच्या मार्फत नोटा बदलून देण्याची प्रक्रिया थांबवण्यात येणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. ८ ऑक्टोबरपासून आरबीआयने निश्चित केलेल्या केंद्रात २००० रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत. याच ठिकाणाहून नोटा बदलून मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here