The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, २३ जुलै : तालुक्यातील गट ग्रामपंचायत कार्यालय गेवर्धा येथील सांस्कृतिक सभागृहात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, तंटामुक्ती सदस्य सुधीर बाळबुद्धे, ग्रा.पं.कर्मचारी दिनेश कावळे, राहुल नखाते उपस्थित होते.