– आंदोलन करण्याचा भारतीय जनता युवमोर्चा चे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांचा इशारा
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १८ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात युरिया खताचा कृत्रिम तुटवडा दाखवून जिल्ह्यातील खत विक्रेते शेतकऱ्यांची आर्थिक पीळवणूक करीत आहेत त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे. जिल्ह्यातील खतांचा काळाबाजार थांबला नाही तर शेतकऱ्यांना सोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता युवमोर्चा चे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी येणाऱ्या नापिकी, दुष्काळी व पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थिती चा सामना करता करता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले आहेत परंतु केंद्र आणि राज्य शासनाच्या उदात्त धोरणामुळे व वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीमुळे थोडाफार सुखावला आहे. या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असताना खत विक्रेत्याकडून मात्र जादा पैसे घेऊन खत विक्री केली जाते, कृत्रिम खताचा तुटवडा दाखवून युरिया खत अव्वाच्या सावा पैसे घेउन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत .
जिल्ह्यातील खताचा काळाबाजार थांबला नाही तर शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा कडक इशारा भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांनी दिला आहे.