जागतिक छायाचित्रकार दिना निमित्त आरमोरी येथे रक्तदान शिबीर

427

– छायाचित्रकार संघटना आरमोरी आणि स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचा पुढाकार
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १९ ऑगस्ट : जागतिक छायाचित्रकार दिना निमित्ताने छायाचित्रकार संघटना आरमोरी आणि स्वयं रक्तदाता जिल्हा समिती यांच्या संयुक्त विदयमाने उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे शनिवार १९ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, रक्ताअभावी रुग्ण दगावु नये म्हणून आरमोरी येथील छायाचित्रकार संघटना तसेच स्वयं रक्तदाता जिल्हा समिती यांच्या संयुक्त विदयमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
लोमेश मुर्वतकर, बालू मने, राहुल हर्षे, कमलेश सोनकुसरे, एकनाथ गजपुरे, प्रतिक खोब्रागडे, उमाकांत वासेकर, ललित गटलेवार, सुमित वणवे, भूषण किरमे, धनराज कोहपरे, शुभम वैरागडे, तुषार भोयर, सुशील मेश्राम, मिलिंन हर्षे, राहुल जुमनाके, मयूर बेहरे, कुणाल मने, अमित हुमने, नवनाथ धोटे, सौरभ बेहरे , किशोर चंदनखेडे, प्रशांत खापरे, ज्ञानेश्वर दोनाडकर, भीमराव वाढई, हितेश वंजारी, अंशुल जैन यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी छायाचित्रकार संघटना आरमोरीच्या वतीने मधुकरजी खापरे, गणेशजी वनवे व स्वयं रक्तदाता जिल्हा समिती गडचिरोली चे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांचा शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आला. यावेळी गणेश वणवे यांनी संघटना कशी मजबूत करायची यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता छायाचित्रकार संघटना आरमोरी चे अध्यक्ष बालु मने, उपाध्यक्ष एकनाथ गजपूरे, सचिव प्रफुल खापरे, सहसचिव लीलेश सहारे, कोषाध्यक्ष सुमित वनवे, मार्गदर्शक अतुल मने, रंजित बनकर, जगदीश वनवे, धनराज कोहपरे, गुरू लोखंडे, सदस्य कमलेश सोनकुसरे, हेमंत कोकोडे, राकेश नंदनवार, करण कुथे, स्वप्नील सोरते, मिथुन येनुगवार, चिरंजीव निखारे, ललित गटलेवार, जयपाल दोनाडकर, कुंदन नंदनवार, प्रणित सेलोकर, यश गजपूरे, विक्की कुंभारे, प्रवीण रहाटे, प्रफुल मोगरे, साई कापकर, गणेश बैरवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रफुल खापरे यांनी केले तर प्रास्ताविक अतुल मने यांनी केले.
उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी, सरिता निकेसर, प्रतिभा आठवले, गौरी साळवे, रमा ढोके, आशीक वासनिक, यांनी रक्तदान शिबिराची व्यवस्था करून दिली. यावेळी जिल्हा रक्तपेढीचे सतीश तडकलावार, निलेश सोनवाणे, जिवन गेडाम, वैशाली सिस्टर, नंदिनी केडमवार, वैभवी हेमके, बंडू कुंभारे यांनी रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य केले.

(the gdv, the gadvishva, armori, blood donet camp armori, swaym raktdata samiti, national photographer day)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here