– ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २५ : ग्रामीण रुग्णालय धानोरा तर्फे २५ जून ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या रक्तदान शिबिरास धानोरा तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये सि.आर.पी.एफ. 113 बटा. चे ७ जवान, पोस्ट ऑफिस येथील ५ कर्मचारी, आरोग्य विभागातील ५ रक्तदाते व धानोरा येथील १३ नागरिकाणी रक्तदान करून समाजिक बांधिलकी जोपासली.
तपासणी करिता वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश गजभे, डॉ संतोष खोब्रागडे, प्र.शा.त. संदीप धात्रक यांनी तपासणी करिता सहकार्य केले.
सदर शिबिरात रक्तदान करणाऱ्यांमध्ये अभिजित राखडे, सौरभ श्रीपदवार, पंकज देविकर, राकेश सरदार, गणेश चिमूरकर, विनेश गावडे, सुहास कावळे, राजदीप उईके, प्रताप बिश्वास, गिरीधर सोनुले, स्वप्नील गणोरकर, मयूर वाघ, महेंद्र नरोटे, संजय लोणारकर, मनोज मेंडे, एस. जयरमन, सचिन कुमार नैन, मृत्युंजय बिश्वास, राजेश अतिलकर, रुपेश ठाकरे, चंद्रशेखर चोलये, चरण तुलावी, शरद भोयर, पवन लक्कस, संकेत तुंकलवार, सुरज काटेंगे, डॉ. संतोष खोब्रागडे, सचिन गावातूरे, पवन कैलार, गोपिभाऊ चौधरी यांचा समावेश आहे.
शिबिराचे आयोजन गणेश कुळमेथे, पुरुषोत्तम चिंचोलकर, गणेश चिमूरकर, सचिन गावतुरे, प्रेम उंदिरवाडे यांनी केले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #blooddonetcamp #dhanora )