– आयसीसी वर्ल्ड कप २०२३ ला शुभेच्छेच्या स्वरुपात समर्पित
The गडविश्व
मनोरंजन / मुंबई, ८ ऑक्टोबर : भारतात सुरू होणाऱ्या ‘आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३’ चे निमित्त साधून ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ भारतीय क्रिकेटपटू आणि नागरिकांमध्ये जोरदार उत्साह वाढवण्यासाठी ‘बोलो भारत माता की जय’ या शीर्षकाचं नवं कोरं उत्स्फूर्त गीत ‘अल्ट्रा म्युझिक’ वर घेऊन येत आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड प्रस्तुत ‘बोलो भारत माता की जय’ प्रेरक गीत ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रेक्षकांना हिंदीमध्ये ऐकायला मिळणार आहे. व्हिडिओ आणि ऑडियो दोन्ही स्वरूपात गीत उपलब्ध होत असून ऑडिओ स्वरूपातील गीत सर्व माध्यमांवर ऐकायला मिळणार आहे. हे प्रेरणादायी गीत दीपक चोहान यांनी शब्दबद्ध केले आहे. ‘नील नटराज’ या संगीतकारांनी संगीतबद्ध केले असून नील यांनी स्वर दिले आहेत.
हे प्रेरक गीत म्हणजे राष्ट्राचा अभिमान आणि गौरवाचे प्रतीक असून एकतेची हाक आहे. आपल्या राष्ट्राच्या विविधतेत असलेल्या एकात्मिक सामर्थ्याचे स्मरण आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनामनात गीत गुंजेल आणि भारतीय क्रिकेटपटूंवरील त्यांचे प्रेम आणि विश्वास वाढवेल. हे प्रेरक गीत भारतीय क्रिकेट संघाच्या उर्जेचा स्त्रोत बनून त्यांना कायम प्रेरणा देत राहील.
“भारतीय खेळाडूंनी अलीकडेच झालेल्या क्रिकेट आणि आशियाई खेळांमध्ये अभूतपूर्व कामगिरी दाखवली आहे. आता होणाऱ्या विश्वचषकातही प्राविण्य मिळवून देण्याची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीच्या मना मनात उत्साहाची ठिणगी पेटवण्यासाठी ‘बोलो भारत माता की जय’ प्रेरक गीत खास शुभेच्छा आणि आमचा सन्मान समजून आम्ही ‘अल्ट्रा म्युझिक’च्या माध्यमातून सादर करत आहोत. हे प्रेरक गीत म्हणजे जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकावण्यासाठीचे खेळाडूंसाठी प्रोत्साहान आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे डायरेक्टर रजत अग्रवाल म्हणाले.
अनेक दशकांचा समृद्ध वारसा घेऊन ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड’ नेहमीच रसिक प्रेक्षकांच्या खास मनोरंजनासाठी नवनवीन गोष्टी सादर करण्यात नेहमी तत्पर असते. अधिक माहितीसाठी आणि खास मनोरंजनासाठी www.ultraindia.com ला नक्की भेट द्या.
Song Link : https://youtu.be/e9M–6h6o6A?feature=shared
भारतीय क्रिकेटपटू आणि नागरिकांमध्ये जोरदार उत्साह वाढवण्यासाठी खास तयार केलेल्या ‘बोलो भारत माता की जय’ या शीर्षक गीतासोबतच झकास मनोरंजन, सदाबहार एकापेक्षा एक कौटुंबिक कथा, विनोदासह जबरदस्त ॲक्शन थ्रिलर चित्रपटांतील ड्रामा अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.