–व्येंकटरावपेठा येथे शिवजयंती निमित्त अभिवादन
The गडविश्व
अहेरी, २० फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा व दरवर्षी याच उत्साहात शिवजयंती चे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरा पर्यंत पोहोचवा असे आवाहन जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शिवजयंती निमित्त कार्यक्रमात उपस्थितांना केले. ते अहेरी तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथे कुणबी समाजा तर्फे शिवजयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलत होते.
व्येंकटरावपेठा येथे शिवजयंती निमित्त जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपस्थिती दसर्शवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना आवाहनही केले.
यावेळी उपस्थित मलेश तुमडे, मनोज चीलमकर, लक्ष्मीनारायण राऊत पो. पाटील, शामराव राऊत, नरेंद्र गर्गम, माधव राऊत, शंकर सिडाम, रवी करमे, घनशाम गौरकर, मधुकर चीलंमकर ग्रा. पं सदस्य, नारायण राऊत, हरी राऊत, गौरया राऊत, राकेश चिंचोलकर, रमेश राऊत, शंकर राऊत, व्यंकटेश राऊत, संतोष चिलमकर, वमसी राऊत, महेश धनुरकर, प्रथम चीलमकर, साई चापले, संदीप चापले, प्रशांत राऊत,सदाशिव राऊत, प्रकाश राऊत, संदीप राऊतसह समस्त युवा मंडळ व गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv)