The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ मे : तालुक्यातील मुरूमगाव येथे जगाला शांतता संदेश देणारे व दया क्षमा शांती चि शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती कार्यक्रम उत्साहात साजरी करण्यात आली .या कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने मिथुन शिरसाट प्रभारी अधिकारी पोलीस मदत केंद्र मुरूमगाव, अविनाश भडांगे वनपरिक्षेत्र अधिकारी, गणेश आठवे पोलीस उपनिरीक्षक, शरीफ भाई कुरेशी तालुका पत्रकार लोकमत समाचार, प्राध्यापक ओम देशमुख, शिव प्रसाद गव्हर्णा सरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव, पद्माकर देशपांडे क्षेत्र सहाय्यक मुरूमगाव, वाय. एस. पठाण वनरक्षक, अभिजीत मेश्राम ग्रामपंचायत सदस्य, तिवारी भोयर ग्रामपंचायत सदस्य, विलास रंगारी ,कोमल मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम आटोपता पद्माकर देशपांडे क्षेत्र सहायक व बौद्ध उपासकाकडून प्रवाशांना व गावातील नागरिकांना व महिलांना अल्पोहार देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नीलकंठ तायडे, विठ्ठल रामटेके, लालाजी रामटेके, धनराज मेश्राम, छाया रामटेके, रंजना गडपायले, धर्मराज गडपायले व समस्त बौद्ध उपासक यांनी सहकार्य केले.