– महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर करीत असताना, विविध प्रकाराच्या कर रचनेत सूट दिली मात्र सर्वसामान्य नागरिकांची इन्कम कशी वाढेल या संदर्भात कुठ्याल्याही प्रकारची प्रभावी तरतूद सांगितली नाही. देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वाधिक कर देणारा राज्य असताना देखील या बजेट मध्ये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशातील सर्वसामान्य जनतेनी केंद्रातील नरेंद्र मोदी च्या नेतृत्वातील भाजप सरकारला तिसऱ्यांदा सत्तेत बसवले मात्र देशातील शेतकरी, महिला, युवक लघु व्यापारी या सर्वांची दिशाभूल करण्याचा काम या बजेट च्या माध्यमातून झाले आहे, युवकांसाठी कायमस्वरूपी रोजगाराच्या योजना नाही, महागाई कमी होईल असे कुठलेही निर्णय नाही, देशाचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव मिळेल या करीता किमान आधारभूत किमंत वाढवण्यासाठी धोरण नाही, इन्कम न वाढवता इन्कम च्या करात सूट देण्यात येईल असे दाखविण्यात आले मात्र सर्वसामान्य नागरिकांची इन्कम कशी वाढेल ते मात्र सांगण्यात आलेले नाही. अशी प्रतिक्रिया महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली यांनी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर दिली आहे.