The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : जिल्ह्यातील मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांसाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनीक यांनी नुकत्याच गडचिरोली दौऱ्यात यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीची गरज अधोरेखित केली आणि निधी मंजुरीसाठी जोरदार मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता या रस्त्यांच्या विकासास प्रारंभ होणार आहे.

रस्ते मजबुतीकरण प्रकल्प :
चंद्रपूर-लोहरा-घंटाचौकी-मुल-हरणघाट-चामोर्शी-घोट-मुलचेरा-अहेरी-वेंकटरापूर-बेजूरपल्ली ते MSH 9 (राज्यमार्ग 370)
कि.मी. 34/670 ते 49/500 (ता. चामोर्शी), मंजूर रक्कम: २०० कोटी
मुधोली-लक्ष्मणपूर-येणापूर-सुभाषग्राम रस्त्याचे मजबुतीकरण (MDR-16)
कि.मी. 0/00 ते 25/000 (ता. चामोर्शी), मंजूर रक्कम: ११५ कोटी
परवा-केळापूर-वणी-वरुड-नागभीड-ब्रम्हपुरी-वडसा-कुरखेडा-कोरची ते राज्य सीमा (राज्यमार्ग 314)
कि.मी. 132/200 ते 144/400 (ता. कोरची),मंजूर रक्कम: ९४ कोटी ९१ लाख
पूल बांधकाम प्रकल्प :
राज्यमार्ग 380 वर पूल बांधकाम, कि.मी. 95/000 ते 114/000 (ता. एटापल्ली)
पूल स्थाने : 117/000, 115/400, 105/550, मंजूर रक्कम: २७ कोटी
राज्यमार्ग 380 वर पूल बांधकाम (एटापल्ली तालुका)
कि.मी. 110/200, मंजूर रक्कम: ५५ कोटी
MSH-09 ते कमलापूर-दमरंचा-मन्येराजाराम-ताडगाव-कांडोली रस्त्यावर बांधिया नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकाम
कि.मी. 3/035 (ब्लॉक भामरागड), मंजूर रक्कम: ३ कोटी
MDR-23 वर लंबीया नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकाम
कि.मी. 5/300, मंजूर रक्कम: २ कोटी ५९ लाख
झिंगानूर-वादाडेली-येडसिली-कल्लेड-कोजेड-डेचाळी रस्त्यावर येडरंगा वेगू नदीवरील पूल व संरक्षण भिंत बांधकाम
कि.मी. 17/050 (ता. अहेरी, जि. गडचिरोली), मंजूर रक्कम: २ कोटी ५० लाख
विकासाच्या दिशेने मोठे पाऊल
मुख्यमंत्री आणि सहपालक मंत्री यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याला मिळणारा हा निधी गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते आणि पूल प्रकल्पांना गती देईल. यामुळे स्थानिक नागरिकांना, व्यापाऱ्यांना तसेच वाहतूक सेवा सुधारेल. त्याचबरोबर, नक्षलग्रस्त भागात विकासाला चालना मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केली आहे.