आरमोरीत भर रस्त्यावर तलवारीने केक कापले : तरुणांना पोलीसांनी केले जेरबंद

1770

– मुद्देमालही जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि.२६ : जिल्ह्यातील आरमोरी शहरात रामाळा मार्गावर रात्रोच्या सुमारास भर रस्त्यावर तलवारीने केक कापणाऱ्या तरूणांना आरमोरी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
लोकेश विनोद बोटकावार ( वय २१), लोकमित्र खुशाल ठाकरे (वय २५), बादल राजेंद्र भोयर (वय २३), पवन मनोहर ठाकरे (वय २५) व फरार आरोपी राहुल मनोहर नागापुरे (वय २८) सर्व रा. बाजारटोली आरमोरी ता. आरमोरी जि. गडचिरोली असे नाव आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हयातील सर्व शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नेहमीच गस्त केल्या जाते. रात्रीच्या वेळी देखील नागरीकांच्या सुरक्षीततेकरीता पोलीस दलाकडुन रात्रगस्त केल्या जाते. गडचिरोली पोलीस दलाकडुन आरमोरी शहरातील रामाळा जाणा­ऱ्या मार्गावर काल २५ नोव्हेंबर २०२३ चे २३. ३० ते २६ नोव्हेंबर २०२३ चे चे ००. ३० वा दरम्यान काही तरुण एकत्र येवुन गोंधळ/आरडा ओरड करत असतांना दिसुन आल्याने चौकशी दरम्यान गाडीच्या सीट वर केक ठेवुन केक अवैधरित्या तलवार बाळगुन केक कापत असतांना तसेच गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडुन आणण्याच्या आदेशाने तलवार सह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
कारवाई दरम्यान एक धारदार टोकदार तलवार अंदाचे किंमत एक हजार ५०० रुपये, एक जुनी वापरती पांढ­या रंगाची अॅक्टीवा ६ जी गाडी नंबर एम. एच. ३३ ए.ए. १३४० अंदाजे किंमत ५५ हजार रुपये, एक जुनी वापरती काळया रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस वाहन क्र एम.एच ३३ वाय ७८५४ अंदाजे किंमत ४० हजार रुपये, मोटार सायकल असा एकुण ९६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द कलम 4/25 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयातील फरार आरोपीचे शोध घेणे सुरु असुन गुन्ह्राचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी येथील परि.पोउपनि संतोष कडाळे हे करीत आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) शयतिश देशमुख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) एम. रमेश सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली मयुर भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरी प्रभारी अधिकारी पोनि. संदिप मंडलीक व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.

तलवारीने केक कापलेले तरुण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here