निवडणूक कर्तव्यावर आला आणि हँडग्रेनेडचा स्फोट ; जवान शहीद

176

– अचानक झालेल्या स्फोटात जवान शहीद
The गडविश्व
दंतेवाडा,दि.६ : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे सुरू आहे. अशातच दंतेवाडा जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यावर आलेल्या बीएसएफ जवानाजवळ ठेवलेल्या हँडग्रेनेडचा स्फोट झाला. या अपघातात जवान शहीद झाला. बलबीर चंद असे या जवानाचे नाव असून तो हिमाचल प्रदेशचा रहिवासी होता.
बस्तरमध्ये ७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. यासाठी बाहेरच्या राज्यातून पोलिस दलालाही सुरक्षेसाठी बस्तरमध्ये पाचारण करण्यात आले आहे. बीएसएफची C-70 चार्ली बटालियन दंतेवाडा येथील काटेकल्याण येथे तैनात आहे. या बटालियनच्या जवानांना ५ नोव्हेंबर रोजी गस्तीसाठी बाहेर काढले जात होते. दरम्यान, जवान बलबीरजवळ ठेवलेल्या हँडग्रेनेडचा अचानक स्फोट झाला. यामुळे शिपाई गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी सहकारी सैनिक निघाले होते, मात्र वाटेतच जवानाचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here