– राधाराणी जन्माष्टमी महोत्सव व महाभिषेक कार्यक्रमाचे कृष्णनगर इस्कॉन मंदिर येथे आयोजन
The गडविश्व
चामोर्शी, दि.१२ : श्री श्री राधा श्यामसुंदर कृष्णनगर धाम इस्कॉन च्या वतीने राधा राणी जन्माष्टमी महोत्सव व महाभिषेक कार्यक्रमाच्या निमित्ताने कृष्णनगर येथे कर्करोग आरोग्य शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी इस्कॉन धाम संस्थेचे अध्यक्ष परमेश्वर दास, सचिव रामानंद दास, सदस्य जगदीश रॉय, सल्लागार बाबुराव कोहळे, उपसचिव गुरुदास कुनघाडकर, नितीन बोमनवार, सुनील बोमनवार नागपूर, रवी यांचे सह भक्त भाविक व व तपासणी करिता आलेले रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते राधा राणी महालक्ष्मीचे दुग्धाभिषेक करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन याप्रसंगी आमदार होळी यांनी केले.