– माय खबर २४ डिजिटल मीडिया युनिक प्लॉटफॉर्मच्या शुभारंभप्रसंगी प्रतिपादन
The गडविश्व
नागपूर, २८ मार्च : हल्ली बदलत्या तंत्रज्ञानाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र असे असतांना तंत्रज्ञान आणि माहितीची योग्य सांगड घातल्यास व ब्लॉगिंग केल्यास चांगले करिअर घडवू शकता असे प्रतिपादन प्रसिद्ध डिजिटल एंटरप्रेन्योर प्रितम नगराळे यांनी केले.
ते नागपुरातील नंदनवन येथील एका हॉटेलमध्ये रीबुस्ट माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेट या युनिक प्लॉटफॉर्मच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बोलत होते.
डिजिटल मीडियाची अफाट ताकद आणि व्याप्ती, म्हणजे डिजिटल नेटवर्क. ही आजच्या काळात एक मोठी शक्ती म्हणावी लागेल. या ताकदीचा उपयोग योग्य कारणासाठी झाला तर डिजिटल मीडियातून क्रांती होऊ शकते. याच कल्पनेतून MY KHABR 24 डिजिटल मीडिया आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरू झाले. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीवेंस कौन्सिलचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, प्रसिद्ध सिनेकलावंत राजेश चिटणीस, प्रज्वल भोयर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणेशवंदना नृत्य सादर करण्यात आले. या उपक्रमाची भूमिका आणि उद्देश रिबूस्ट माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेटचे फाऊंडर प्रितम मडावी यांनी स्पष्ट केली.
व त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपला शुभेच्छा संदेश दिला. पाहुण्यांच्या हस्ते रिमोट दाबून शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी विशेष सहकार्यासाठी निर्मय इंफ्राटेक ग्रुपचे संस्थापक नयन घाटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर सोहळ्याचे अध्यक्ष ॲड. फिरदोस मिर्झा यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत, आभार माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेटचे फाऊंडर कृष्णा शेंडे यांनी मानले. आयोजनासाठी ऋतिक अलाम, भूपेंद्र शेंडे, स्वप्नील मडावी, जितेंद्र शेंडे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
(The Gadvishva) (the gdv) (my khabar 24 digital) (nagpur) (Career Opportunities Through Blogging : Pritam Nagarle)