– मोहफुल वेचणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, मोहफुलाला जातांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन
The गडविश्व
नागभीड, ५ एप्रिल : सध्या मोहफुल वाचण्याचा हंगाम सुरू असल्याने अनेकजण जंगल परिसरात मोहफुल वेचण्याकरिता जातात. मात्र ते करत असतांना सतर्कता बाळगणे आवश्यक असते. मोहफुल वेचण्याकरिता गावलगतच्या जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मंगळवार ४ एप्रिल रोजी नागभीड तालुक्यात घडली. अरुण महादेव रंधये (५६) रा.तुकुम असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अरुण रंधये हे मोहफुल वेचण्याकरिता जंगलात गेले होते. मोहफुल वेचत असतांना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार केले. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्याने कुटुंबातील काही व्यक्ती व शेजारील व्यक्तींनी जंगल परिसरात धाव घेत शोधाशोध केला असता मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती लागलीच वनविभागाला देण्यात आली असता वनर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले व पुढील कार्यवाही केली.
सदर घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून मोह वेचण्याकरिता जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. तर मोह वेचायला जातांना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, जंगल परिसरात वाघाचा व इतर वन्यप्राण्याचा वावर असल्याने जास्त खोलवर जंगलात प्रवेश करू नये असे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.
(The Gadvishva) (The gdv) (tiger attack 2023) (nagbhid tukum) (chandrpur tiger)